सरस्वती विद्यालयात सायकलचे वाटप

सरस्वती विद्यालयात सायकलचे वाटप
तळोधी बा.;
येथून जवळच असलेल्या नागभीड तालुक्यातील कोजबी येथील, जनकल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था द्वारे संचालीत,सरस्वती विद्यालयात मानव विकास योजनेअंतर्गत अठरा विद्यार्थीनींना सायकलचे वाटप नुकतेच करण्यात आले.
            बाहेरगावच्या विद्यार्थीनींना शाळेत ये-जा करणे सोयीचे व्हावे, विद्यार्थीनींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे, विद्यार्थीनी शालाबाह्य होऊ नये यासाठी शासनाने मानव विकास योजना सुरु केली आहे. सरस्वती विद्यालयातील अठरा विद्यार्थीनींना या योजनेचा लाभ मिळाला. सदर सायकलींच्या वाटपाप्रसंगी जनकल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था नवरगावच्या सचिव मनीषा किशोर बारापात्रे, सदस्य संकेत किशोर बारापात्रे, मुख्याध्यापक दीपक बोकडे, सहायक शिक्षक सुरेश खोब्रागडे, सुरेश बोरकर, चंद्रशेखर गायकवाड, मधुसूदन नागपूरे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]