सुभेदार रामजी आंबेडकर वाचनालायाच्या वर्धापण दिनी आयोजित कार्यक्रमात प्रशांत तावाडे यांचा सत्कार
माझ्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सत्कार होने ही माझ्या कार्याची पावती...स्वच्छतादुत प्रशांत तावाडे यांचे प्रतिपादान.

देशामध्ये अनेक उच्च पदस्त राजकारणी, समाजसेवक, संस्था संघटना चालविणाऱ्या गणमान्य व्यक्तींचा सत्कार समारंभ होत असतातच पण सावली सारख्या ग्रामीण भागात नेहमीच मी स्वछतेचे कार्य करीत आहे. रस्त्यावर-कार्यालया समोर दिसत असलेला केरकचरा उचलून विल्हेवाट लावणे हे माझे कार्य आहे.याचं माझ्या सामाजिक, स्वच्छतेच्या कार्याची दखल घेऊन सत्कार होने ही माझ्या कार्याची पावती म्हणजे माझा सत्कार आहे.असे मत स्वच्छतादूत श्री.प्रशांत तावाडे यांनी व्यक्त केले.नुकताच सावली येथील सुभेदार रामजी आंबेडकर वाचनालायाच्या वर्धापण दिन सोहळा पार पडला या आयोजित कार्यक्रमात अनेकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सावली येथील समाजिक कार्यकर्ता तथा स्वच्छतादुत श्री. प्रशांत तावाडे यांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छतेचे पुजारी संत गाडगेबाबा , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या " स्वच्छ ग्राम असावे, आपले गाव स्वच्छ असावे" या त्यांचा संकल्पनेची प्रेरणा घेऊन प्रशांत तावाडे नेहमीच राष्ट्रीय महा मार्गांवरील, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन, गोळीबार चौक, जयभिम वाचनालय परिसर, व सावळीतील मुख्य चौकातील आदी ठिकाणाचा नित्य नेमाने केरकचरा साफ सफाई करून परिसर स्वच्छ करीत असतो.या पूर्वी अनेक कार्यक्रमात त्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. चंद्रपूरचे पालकमंत्री मा.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकार,  राज्य सरकारने स्वच्छ भारत अभियान व स्पर्धा केल्या होत्या. शहरी व ग्रामीण भागात सुद्धा स्वच्छतेसाठी त्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे.  परंतु कोणतेही लोभ व्हा पुरस्कार याबद्दल अपेक्षा न करता आपल्या हाती घेतलेल्या स्वच्छतेचा व्रताचे पालन करीत आपले आद्य कर्तव्य समजुन ते नित्य नेमाने करीत आहेत.त्यांचा या कार्याला सलाम करीत त्यांना हा सन्मान भेटणे सावलीकरांसाठी  अभिमानास्पद आहे. या वेळी. माजी.जि.प.सदस्य अँड.राम मेश्राम,माजी नगराध्यक्ष विलास यासलवार, सावली न.प. विद्यमान उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार ,अँड.आदर्श गेडाम,विशाखा गेडाम, डॉ.अपेक्षा बांबोळे, चंद्रभागाबाई गेडाम  वाचनालाचे अध्यक्ष चंद्रकांतजि गेडाम सत्कारा प्रसंगी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]