बोगस आदिवासींना समर्थन देणाऱ्या सरकारविरोधात सावलीत मोर्चा - आदिवासी विकास परिषद व विविध संघटनांचे नेतृत्वसावली -(प्रतिनिधी) 
अनुसूचित जमातीची बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी बळकाविणाऱ्या गैर आदिवासींना नोकरीवरून न काढता त्यांना निवृत्तीवेतन व इतर सोयी सुविधा देऊन त्यांचे समर्थन करणारे निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतल्याने या विरोधात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली व विविध आदिवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बोगस आदिवासीवर कारवाई करण्यात यावी व विविध मागण्या घेऊन सावली तहसिल कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला. 
    अनुसूचित जमातीची जातवैधता प्रमाणपत्र अवैद्य ठरविल्यानंतरही आशा बोगस जातींना नोकरीतून काढून न टाकता त्यांना निवृत्तीवेतन व इतर सुविधा देण्याचा निर्णय शासनाने नुकतेच घेतल्याने आदिवासी समाज आक्रमक झालेला आहे.  आदीवासी संघटनेचे केशव तिराणीक , गुलाब मडावी, जनार्दन गेडाम ,अतुल कोडापे, बापुजी मडावी, जितेश कुळमेथे,अशोक उईके,तुकाराम गेडाम, महिपाल मडावी, प्रदीप गेडाम, कुणाल कोवे प्रविण गेडाम, योगिता पेंदाम, लखन मेश्राम, यशवंत ताडाम,क्रिष्णा कन्नाके, एकनाथ कन्नाके, राजु कोडापे, लखन मेश्राम, युवराज उईके,आदी आदिवासी बांधव उपस्थित होते. धडक मोर्चाची सुरुवात आदिवासी वस्तीगुहा पासुन  सावली शहराच्या मुख्य मार्गाने तहसील कचेरीवर नेण्यात आला , मुल ,सावली,सिंदेवाही या तालुक्यातील वरठी,धोबी यांनी नामसदृश्यतेचा  गैरफायदा घेत धोबा करून आदीवासींच्या सवलती लाटण्याचा जात चोरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह धोबा जमात प्रमाणपत्र तात्काळ रद्द करणे, 6 जुन 2017नुसार बोगस आदीवासींना सेवेतून बडतर्फ करण्याबाबत त्या सर्वोच्च न्यायालयीन निकालाची त्वरीत अमंलबजावणी करण्याबाबत , जे अधिकारी जमात निहाय योग्य शहानिशा न करता बोगस जात प्रमाणपत्र प्रदान करतात अशा अधिका-यावर फौजदारी गुन्हा सह सेवेतून निष्कासित करावे, चंद्रपूर जिल्हामधील भुमीहीन.लोकांचे संरक्षण करून मोफत शासकीय जमीन देण्यात यावे, आदिवासी अतिक्रमीत शेतकऱ्यांना विनाअट तात्काळ जमीनीचे पट्टे देण्यात यावे,संविधानातील 5 व 6 व्या अनुसुचीची अमंलबजावणी करण्यात यावी, गैर आदिवासी खोटे जातप्रमाणपत्र सादर करून 12500 पदे बळकावली आहे , ते पद रद्द करून ख-या आदींवासी चा समावेश करावा, अशा विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
    धडक मोर्चाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा जिल्हा अध्यक्ष अतुल कोडापे, तालुका अध्यक्ष प्रविण गेडाम, यासह गोंडवाना संघटना, बिरसा दल, बिरसा क्रांती, बिरसा ब्रिगेड, आफरोट, इंडियन ट्रायबल व्हालेंटिअर , आग्रनेशनन ,जागर अशा संघटना व कर्मचारी सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]