दिशा जुनिअर कॉलेजचे व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये घवघवीत यश

तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )

वरोरा : - दिनांक 21 डिसेंबर जिल्हास्तरावर प्रथम स्थान पटकाविलेल्या वरोरा येथील दिशा ज्युनिअर कॉलेजच्या 19 वर्षाखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने विभागीय स्तरावर बाजी मारली.
          नुकत्याच चंद्रपूर येथे 19 वर्षाखालील मुलांचे व्हॉलीबॉल  सामने संपन्न झाले . संपूर्ण जिल्ह्यातून दिशा जुनियर कॉलेजच्या खेळाडूंनी प्रथम स्थान पटकावी विभागीय स्तरावर प्रतिनिधित्व केले. बुधवारला गोंदिया येथे झालेल्या विभागीय व्हॉलीबॉल सामन्यांमध्ये या संघाने प्रथम स्थान पटकावी राज्यस्तरावर आपले स्थान निश्चित केले आहे. राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये पात्र ठरलेला हा वरोऱ्यातील एकोणवीस वर्षाखालील खेळाडूंचा पहिलाच संघ असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे हे सर्व खेळाडू स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे नियमित खेळाडू असून क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व प्रशिक्षकांनी तसेच  महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप डाखरे, प्रा रुपेश घागी,  प्रा गणेश पावडे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]