अल्पवयीन मुलीला केले गर्भवती आरोपीवर गुन्हा दाखल

 
 
पोंभुर्णा (विजय वासेकर)
लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला लैंगिक‌ संबंध प्रस्थापित केल्याने गर्भधारणा झाली असल्याने फिर्यादी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणय जंगलू कातकर वय (१८) रा. जामतुकुम असे आरोपीचे नाव आहे.


पिडित अल्पवयीन मुलीला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून संबंध प्रस्थापित केले.यातून पिडीतेला गर्भधारणा झाली.
वैद्यकीय तपासणीतून पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे लक्षात येताच सदर प्रकरणाची माहिती पोंभूर्णा पोलिस स्टेशनला देण्यात आली. पिडितेने झालेल्या प्रकरणाबद्दल तक्रार दाखल केली असता आरोपी प्रणय जगलू कातकर याचेविरूद्ध कलम ३७६/२,३७६/३ भादवी सहकलम ४,६,पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून. घटनेचा तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]