सादागड व चारगाव येथील तलावाची दुरुस्ती करा - माजी सभापती कोरेवार यांची मागणी


सावली - सादागड हेटी येथील तलाची पाळ ऐन पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे फुटली व चारगाव येथील तलावाचे बांधकाम करण्यात आले मात्र लिकेज असल्याने पाणी निघून जात आहे. शेतकऱ्यांनी तात्पुरती सोय करून पिके घेतली परंतु कायमस्वरूपी सिंचनाकरिता बांधकाम करणे आवश्यक असल्याने काम करण्याची मागणी माजी सभापती विजय कोरेवार यांनी केली आहे.
     सादागड हेटी येथील पावसाळ्यात  शेतकऱ्यांचे शेतातील माती वाहून गेल्यामुळे फारच नुकसान झाले. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी श्रमदानातून तात्पुरती बंधारा बांधून पाणी अडविले. पावसाळ्यात पाऊस चांगला पडल्यामुळे पीक काही प्रमाणात घेता आले.  मात्र यावर्षी  तलावाचे काम न झाल्यास येथील शेतकरी पीक घेऊ शकत नाही. 
        चारगाव येथील तलावाचे मातीचे काम व गेटचे काम सन १७-१८ मध्ये करण्यात आले. दोष दुरुस्तीचे काम ५ वर्षापर्यंत कंत्राटदाराचे होते. ५ वर्षाचे आत गेटला लिकेज असल्यामुळे दुरुस्ती कंत्राटदाराने करावी. सादागड हेटी व चारगाव तलावाची कामे लवकरात लवकर करावे अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी उपअभियंता जलसंधारण जिल्हा परिषद उपविभाग मूल यांचेकडे केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]