सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिवस साजरा.

सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिवस साजरा.


    मुल तालुक्यातील चिमढा, टेकाडी, मरेगाव, चीतेगाव, मोरवाही,डोंगरगाव, राजोली येथे मॅजिक बस इंडिया फाउंडेशन व जिल्हा परिषद चंद्रपूर च्या वतीने जीवन कौशल्य या कार्यक्रमा अंतर्गत दि.०३ जानेवारी २०२३ ला सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे बालिका स्वतःसाठी व देशासाठी किती महत्वाच्या आहे हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन शालेय बालपंचायतने यांनी  केले.बालपंचायतच्या मासिक बैठकीत सर्व मंत्रिमंडळ यांच्या सहमतीने प्रत्यक्ष ठराव घेऊन ०३ जानेवारी २०२३ सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिवस साजरा करण्याचे व याचे संपूर्ण नियोजन बालपंचायत करेल असा ठराव घेण्यात आला.
       बालपंचायतने यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या व बक्षिसे सुद्धा ठेवण्यात आली. बालपंचायत मधील प्रत्येक मंत्री यांनी जबाबदारी वाटून घेतली.
            सदर कार्यक्रम मॅजिक बस चे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम  अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला.या कार्यक्रमाला गावातील महिला मंडळी व युवक युवती मोठया संख्येने उपस्थिती दर्शीवली तसेच हा संपूर्ण कार्यक्रम बालपंचायत यांनी यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्यध्यापक व सर्व शिक्षकवृंद शाळा व्यवस्थापन समिती पालक ,पदाधिकारी,शाळा सहाय्यक अधिकारी, समुदाय समनव्यक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]