दहेगाव-भेजगाव घाटातून अवैधपणे रेतीची तस्करी.

दहेगाव-भेजगाव घाटातून अवैधपणे रेतीची तस्करी. 

रात्रीच होतेय अवैध्य उत्खनन व वाहतूक.


मूल (प्रतिनिधी)

तालुक्यातील उमा व अंधारी नदी घाट रेती उपसा रेती घाटाकरिता शासकीय लिलाव झालेला आहे. रेती घाटातून मागील महिना भरापासून मोठ्या प्रमाणात रेतीची  यंत्राद्वारे थेट नदीतून उपसा करून नियमबाह्य उत्खनन व वाहतूक केल्या जात आहे.  नदी पात्रात रेती वाहतुकीसाठी यंत्राद्वारे मार्ग तयार करून संबंधित कंत्राटदाराने शासनाच्या नियमाची पायमल्ली केली आहे.

तालुक्यात प्रामुख्याने उमा व अंधारी नदी वाहत असून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शासनाकडून रेती घाट लिलाव करण्यात आले आहे. मागील वर्षी तालुक्यात महसूल प्रशासनाने  कर्मचारी यांना घेऊन  अवैध रेती उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांसाठी दिवस रात्र गस्त मोहीम राबवली होती. त्यामुळे रेती तस्कर व  कंत्राटदार यांच्यात मोठी धास्ती निर्माण झाली होती. व बऱ्याच प्रमाणात  अवैध रेती वाहतुकिवर  आळा बसला होता. त्यामुळे  तालुक्यात घाट लिलावात कंत्राट दार समोर येतील की नाही असा मोठा प्रश्न तालुक्यातील अनेक नागरिकांना पडला होता.

परंतु यावर्षी स्थिती उलट झाली आहे.  महिना भरापसून रेती ठेकेदार घाट लिलाव होऊन काहिक दिवसाचा कालावधी लोटला  नसताना सुद्धा उमा व अंधारी नदीच्या रेतीघाटा मधून नियमबाह्यपणे रात्रीच मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतूक करीत आहे. 


सदर रेतीघाटातून संबंधित कंत्राटदाराने रेती काढणे सुरू केले आहे. मात्र, सर्व शासकीय सूचना आणि नियम धाब्यावर बसवत टिप्परने दिवसरात्र नियमबाह्यपणे रेती वाहतूक केली जात असल्याने पर्यावरणाची सुद्धा ऐसीतैसी होत असून तालुक्यातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यात ओवर लोड वाहतुकीने रस्त्यांचीही बिकट परिस्थिती झाली आहे. येथील रेती घाटातून मागील महिना भरापासून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून, रेती साठवणूक करून विक्री केली जात आहे.  यावर जिल्हा/तालुका प्रशासनाने अंकुश लावणे गरजेचे असून संबंधित प्रशासनाबाबत नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे. यावर तात्काळ उपाय न झाल्यास येत्या काही दिवसांत रेती कंत्राट दाराविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असून महसूल/ पर्यावरण खात्याची नुकसान करणाऱ्या कंत्राटदार विरोधात विविध संघटनेद्वारे निवेदन देण्यात येणार आहे.  

अवैद्य रेती उत्खनन व वाहतूक प्रकरणाची सखोल चौकशी करावी. सुशी दाबगाव, दहेगाव, हळदी, भेजगाव व तालुक्यातील इतर गावातून होणारी जड वाहतूक बंद झाली पाहिजे. डांबरीकरण रस्त्याची दुरावस्था झाली तर संबंधित ठेकेदाराकडून नुकसानभरपाई वसूल करावी. व रात्रीला प्रशासनाकडून गस्त  मोहीम घालून अवैध रेती  वाहतुकीवर आळा घालावा  अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

पर्यावरणाच्या नियमांची ऐसीतैसी.

"पर्यावरण विभागाच्या नियमानुसार परवानगी दिलेल्या खोलीपेक्षा अधिक खोलवर जाऊन रेती उत्खनन करता येत नाही. तसे निदर्शनास आल्यास लिलावधारकांकडून घेण्यात आलेली अनामत रक्कम जप्त करून तो रेती उपसा अवैध ठरविला जातो. त्याचा परवाना सुद्धा रद्द केला जातो.    लिलावधारकाला नियमानुसार यंत्रसामग्री नदीपात्रात उतरवता येत नाही. वाहनात वाळू भरण्यासाठी यंत्राच्या वापरावर बंदी आहे. मात्र, हे सारे नियम धाब्यावर बसवून वरील नदीपात्रात रेती उत्खनन व वाहतूक होत आहे."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]