सावली पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रभारीपदी तेलकापल्लीवार


सावली पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रभारीपदी तेलकापल्लीवार
सावली - सावली पंचायत समिती गटविकास अधिकारी पदाचा प्रभार येथिल सहाय्यक गटविकास अधिकारी तेलकापल्लीवार यांचेकडे देण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिला आहे.
सावली पंचायत समिती येथील सहाय्यक गटविकास अधिकारी पद रिक्त असल्याने पोंभुर्णा येथील सहाय्यक गटविकास अधिकारी सुनीता मरसकोले यांचेकडे गटविकास अधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला होता. मरसकोले यांचेकडे जवळपास दीड वर्ष पद होते. पंचायत समिती पदाधिकारीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांचेकडे प्रशासक म्हणूनही जबाबदारी आली. या कार्यकाळात त्यांच्या कामावर इतर अधिकारी नाराज होते. १७ नोव्हेंबर २०२२ ला सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून जगन्नाथ तेलकापलीवार रुजू झाले . त्याचवेळी बिडीओचे प्रभार पद त्यांचेकडे द्यायला पाहिजे होते परंतु विद्यमान बीडीओ मरसकोले यांनी सावली येथेच राहण्याची इच्छा असल्याने मुंबईपर्यंत प्रयत्न चालविले होते. मात्र ज्या ठिकाणी सहाय्यक गटविकास अधिकारी असतो त्यांचेकडे तेथील प्रभार देण्याचा नियम असल्याने अखेर सीईओ यांनी तेलकापल्लीवार यांचेकडे प्रभार देण्याचा आदेश काढला. मरसकोले हे पोंभुर्णा येथे आपल्या सहाय्यक गटविकास अधिकारी पदावर परत जाणार आहेत. आज दिवसभर बदलीची चर्चा होती. फाईली मागविण्यात येऊन रात्रपर्यंत धनादेश देण्यात आले, उर्वरीत कामकाज करणे बाकी असल्याने प्रभार झाला नाही. मात्र या आदेशामुळे पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]