रामाळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात ५ मेंढ्या ठार


गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील रामाळा येथे रात्रोच्या सुमारास मेंढ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला करीत ५ मेंढ्या ठार केले.
    रामाळा येथे कुरमार हा मेंढपाळ समाज मोठया प्रमाणात असून शेळ्या मेंढ्या पाळणे हा मुख्य व्यवसाय आहे. रात्रोच्या सुमारास घराजवळ १७ मेंढ्याचा कळप असताना बिबट्याने हल्ला केल्याने पोचुजी जिगरवार या मेंढपाळाच्या ५ मेंढ्या ठार झाले तर ४ मेंढ्या जखमी झाले. यामुळे मेंढपाळावर आर्थिक संकट कोसळले आहे. वनविभागाचे अधिकाऱ्यांनी मौका पंचनामा केला असून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या घटनेमुळे गावकरी धास्तावले असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]