क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'बालिकादिन' उत्साहात साजरा
 तळोधी(बा)
दिनांक ३जानेवारी २०२३
    दी रुरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी द्वारा संचालित लोकविद्यालय तळोधी(बा)येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात 'बालिकादिन' उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला , दीपप्रज्वलन व सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वर्ग 8 (अ)ची विद्यार्थिनी समृद्धी कामडी हीने कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर केले, "शिक्षण ,वाचन करून समृद्ध व्हा व घर ,शाळा ,समाज प्रत्येक ठिकाणीच स्त्रीचा आदर ,सन्मान करा"असा संदेश तिने दिला.
    'लेक वाचवा, लेक शिकवा', 'मी सावित्रीबाई फुले बोलते' या विषयावर इयत्ता ५ वी ते १० वीचे विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी भाषण व वेशभूषा स्पर्धेत सहभागी झाले होते.
  अध्यक्षीय भाषणात जेष्ठ शिक्षक पि.यु. गिरडकर यांनी आपल्या मनोगतातून स्त्रियांच्या बालिकांच्या आजच्या समस्या मांडून "तुम्ही सावित्रीच्या लेकी आजच्या आव्हानांना सामोरे जायला स्वतःला समर्थ ,बळकट बनवा!" असा संदेश दिला.
  पदवीधर शिक्षक संतोष दामोधर नन्नावार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील वर्ग 8 (अ) आणि (क ) च्या विद्यार्थीनी कु.श्रुती उद्धव सोनवाणे यांनी केले व गायत्री सोमेश्वर गुरूनले हिने आभार मानले.
    या कार्यक्रमाकरीता प्रमुख अतिथी जेष्ठ शिक्षक प्रमोद पाकमोडे ,रवींद्र निनावे , आर.डी.हांडेकर, एस.व्ही. बालमवार, सोनल उंबरकर,अजय सगळाम,ज्योती मोहूर्ले, इतर पालक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]