तळोधी बाळापूर पोलीस तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजनयश कायरकर.
 आज दिनांक ५ जानेवारी रोज गुरुवारला तळोधी बाळापूर येथील साई मंदिराच्या पटांगणामध्ये तळोधी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.  यावेळी ३२ रक्तदात्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन  मोलाचं रक्तदान केले. 
      यामध्ये रक्तदान शिबिर मध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आले. हे रक्त नासिक राव तिरपुडे ब्लड बँक नागपूर येथे देण्यात आले.
    तरी ह्या सकाळी ११ वाजता ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला, तळोधी बा. पोलीस स्टेशन चे निरिक्षक बी.आर. शेंडे, व त्यांच्या पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी, तळोधी बा.परिसरातील पोलीस पाटील, युवक तथा ईतर अशा ३२ रक्तदात्यांनी वेगवेगळ्या गटांचे रक्त रक्तदान करून  यावेळी सहकार्य केले. याबद्दल तळोधी बा.पोलीस ने त्या रक्तदात्यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]