ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके संकटात.. शेतकऱ्याची वाढली चिंता.. अतिरिक्त फवारणीच्या आर्थिक बसनार खर्च..
शेगाव..जगदीश पेंदाम

 परिसरात मागील दोन ते तिन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून रिमझिम पावसाने सुद्धा हजरी लावली आहे, त्यामुळे ढगाळ वातावरणाच्या गहू, हरभरा,तुर, ज्वारी, लाख, लाखोरी,जवस, या पिकांना मोठा फटका बसताना दिसत आहे....
दोन ते तीन दिवसापासून परिसरामध्ये ढगाळ वातावरण तसेच रिमझिम पावसाने सुरुवात केली तसेच धुके परिसरामध्ये चादर पसरवली असल्यामुळे शेतकरी चिंता ग्रस्त झालेले आहे शेतकरी आधीच अतिवृष्टी पावसामुळे सावरत रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली.
खरीप हंगामातील कपासाची पिके अतिवृष्टी पावसाने तर तुरीची पिके धुक्यामुळे खराब झालेली आहे आता रब्बी हंगामातील गहू ,हरभरा ,लाखोरी, ज्वारी, जवस आदी पिकासह नष्ट होण्याच्या मार्गावर आलेली आहे
एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू असून शेतकऱ्यांच्या कपास, धानाला भाव मिळत नसल्यामुळे अगोदरच शेतकरी हवालदिर झालेला असल्यामुळे कृषी केंद्राचे बिल भरण्यासाठी मिळेल त्या किमतीमध्ये भावना धान ,कपास, विकत आहे....
बदलत्या ढगाळ वातावरणामुळे चना, गहू ज्वारी, लाखोरी, आधी पिकासह भाजीपाला टमाटर, मिरची, वांगे, गोबी, सांबार, पालक, मेथी, या पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे  फवारणी करण्याकरीता शेतकरी कृषी केंद्राकडे धाव घेत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]