अथर्व खोब्रागडे चंद्रपूर जिल्ह्यात शहरी विभागातून प्रथम मेरिट
                  शैक्षणिक सत्र २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बालविकास प्राथमिक शाळा मूलचा विद्यार्थी असलेल्या अथर्व लक्ष्मण खोब्रागडे याने ८३.२२% गुण प्राप्त करून चंद्रपूर जिल्याच्या शहरी विभागातून प्रथम मेरिट प्राप्त केली आहे . 
           अथर्व लक्ष्मण खोब्रागडे हा बालविकास प्राथमिक शाळा मूल या मराठी माध्यमाच्या शाळेचा विद्यार्थी असून त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता बूटे , मार्गदर्शक शिक्षक ललित लांजेवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले . त्याचबरोबर मार्गदर्शन करण्यासाठी संतोष सोनवाणे , सचिन बल्लावार , ज्ञानेश्वर ननावरे , विवेक हरमवार , शिल्पा कापसे , कविता खोब्रागडे यांनी मोलाची भूमिका बजावली . 
       अथर्वच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]