खेडी परीसरात आणखी वाघाचे दर्शन वनविभागाचे कार्यालयावर मोर्चा काढणार*


सावली - खेडी, रुद्रापूर या भागात बाबुराव कांबळी, स्वरूपा येलेंट्टीवार हे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावल्यानंतर वनविभागाने जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र अजूनही यश आले नाही. शेतात कापूस, तूर, भाजीपाला ही पीके उभे आहेत. शेतात गेल्याशिवाय शेतकरी, मजुरांना पर्याय नाही. अजूनही रोज वाघाचे दर्शन होत असताना वनविभाग मात्र खेडी परिसरातील वाघाला जेरबंद करण्यासाठी उत्साही नसल्याचे खेडी वासीयांचा आरोप आहे. त्यामुळे वाघ जेरबंद करण्यासाठी वनविभागाने कडक पावले न उचलल्यास मंगळवारी सावली वनविभागाचे कार्यालयावर धडक देणार आहेत.
"वाघाचे दर्शन खेडी परिसरात होत असताना मात्र वनविभाग वाघ जेरबंद करण्यासाठी कठोर पावले उचलत नसल्याने वनविभागाविरुद्ध परिसरात रोष आहे. अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता घेऊन पिंजरे वाढवून, शार्प शूटरद्वारे वाघास जेरबंद करावे"
विजय कोरेवार
माजी सभापती पं. स. सावली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]