तळोधी येथे महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्नतळोधी बा.: 
      आमदार कीर्तिकुमार  भांगडीया यांच्या हस्ते नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथे माळी समाजाच्या सौजन्याने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न झाला.
        याप्रसंगी आमदार बंटीभाऊंनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सर्व थोर महात्म्यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन तथा दीपप्रज्वलन, माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले आणि उपस्थित माळी समाजबांधवांना विविध विषयांवर संबोधित केले. 
         सदर कार्यक्रमाप्रसंगी माळी समाजाच्या वतीने आमदार बंटीभाऊंचे पारंपारिक लेझीम नृत्य सादर करत विशेष स्वागत व पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात आला.
         यावेळी प्रामुख्याने से.नि. शिक्षक बबनराव गुरनुले सर, डॉ. एन.एस. कोकोडे सर, माजी जि.प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले, कृ.उ.बा. समिती सभापती अवेश पठाण, भाजपा तालुका महामंत्री जगदीश सडमाके, भास्कर लोनबले, छाया मदनकर, राजेश घिये, युवराज सावरकर, जिवेश सयाम, विजया वाढई, विलास लांजेवार, वैशाली लांजेवार, अनिल शेंडे, शशिकांत शेंडे, संजय गुरूनुले, विलास लोथे, सुनिल गुरनुले व अन्य मान्यवर आणि माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]