चांदली बूज येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी


सावली- माळी समाजाचे वतीने चांदली बूज. येथे मिरवणूक व मार्गदर्शन कार्यक्रम घेऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
     "ज्या पद्धतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना पुढे आणण्याचे काम केले. त्याप्रमाणे आजच्या महिलांनी अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे" असे कार्यक्रमाचे उदघाटक सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सभापती यांनी "सावित्रीबाई फुले यांच्यासारखे महान होऊ शकत नाही पण त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करायला पाहिजे" असे मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच विठ्ठल येगावार, उपसरपंच मनीषा मोहूर्ले, मुखध्यापिका येडनूतलवार, पोलीस पाटील चिंतामण बालमवार, तंटामुक्ती अध्यक्ष नरेंद्र संतोषवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]