जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नेरी ता.चिमूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक 03/01/23 रोजी दुपारी 12/00 वा. ते 01/00 वा. या कालावधीमध्ये जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नेरी ता. चिमूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन निमित्ताने  महिलांवरील होणारे अत्याचार, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण, वाहतूक नियम या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.
        सदर कार्यक्रमास इयत्ता 5 ते 12 वी चे एकूण 500 विद्यार्थी उपस्थित होते. जनजागृती कार्यक्रम पो.नि. मनोज गभने यांचे प्रमुख मार्गदर्शनात तसेच महाविद्यालयाचे मुख्याध्यापक येरणे सर, सर्व शिक्षक वृंद, पोलीस स्टेशन चिमुरचे ना.पो.अं./कैलास आलाम, महिला अंमलदार महानंदा आंधळे, मयुरी कोराम, चालक पोलीस हवालदार कैलास वनकर यांच्या सहकार्यातून पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]