उत्तर ब्रम्हपुरी / नागभिड वनपरिक्षेत्रामध्ये धुमाकुळ माजविणारी P-1 वाघीण जेरबंद.
तळोधी बा (यश कायरकर)

      गत  दोन दिवसांमध्ये इरव्हा व तोरगाव  या दोन गावांमध्ये मध्ये दोन महिलांचा बळी घेणारी ब्रह्मपुरी व नागभीड वनपरिक्षेत्रातील वाघीण जोरबंद करण्यात ब्रह्मपुरी वन विभागाला यश.
        ब्रम्हपुरी वनविभागातील दिनांक 30/12/2022 रोजी नागभिड वनपरिक्षेत्रातील मौजा ईरव्हा येथील शेतशिवार परिसरात श्रीमती नर्मदा प्रकाश भोयर व दिनांक 31/12/2022 रोजी उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील मौजा तोरगांव येथील सौ सिताबाई रामजी सलामे यांना P-1 वाघीणीने (मादी) हल्ला करून ठार केले होते.
          त्यामुळे आज दिनांक 01/01/2023 रोजी उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत ब्रम्हपुरी उपक्षेत्रातील तोरगांव नियतक्षेत्रामध्ये (गट क्र. 60) डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकिय अधिकारी (वन्यजीव), TTC, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांनी व बी. एम. वनकर, वनरक्षक ( शुटर) यांनी P-1 (मादी) वाघीणीस अचुक निशाना साधून दुपारी 3.07 वाजता डार्ट केला व सदर वाघीण बेशुध्द झाल्यानंतर तीला दुपारी 3.32 वाजता पिंज-यात सुरक्षितरित्या बंदिस्त केले.
              सदरची कार्यवाही श्री एम. बी. चोपडे, सहायक वनसंरक्षक (प्रादे व वन्य) ब्रम्हपुरी, श्री कैलास धोंडणे, सहायक वनसंरक्षक (तेंदू), श्री एम. बी. गायकवाड, वनक्षेत्रपाल (प्रा) उत्तर ब्रम्हपुरी, श्री आर. डी. शेंडे, वनक्षेत्रपाल (प्रा) दक्षिण ब्रम्हपुरी वनविभागाचे क्षेत्रिय अधिकारी / कर्मचारी, तसेच RRU, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूरचे सदस्य श्री के. जी. डांगे, श्री एस. एस. पोईनकर, श्री अंकित पडगेलवार व श्री राकेश अहुजा (फिल्ड बायोलॉजिस्ट, ब्रम्हपुरी) यांचे उपस्थितीत पार पडली.
             जेरबंद करण्यात आलेल्या P-1 वाघीणीचे (मादी) वय अंदाजे दोन ते अडीच वर्षे असून त्याला पुढील तपासणीकरिता ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्यात येईल.
    "परिसरातील वाघिन जोरबंद करण्यात आली असली तरी मात्र परिसरातील शेतकरी व लोकांनी जंगलात किंवा जंगला शेजारी शेतात वावरताना काळजी घ्यायला हवी." असे सहाय्यक वन संरक्षण उप वनसंरक्षक ब्रम्हपुरी के. आर. धोंडने यांनी लोकांना निवेदन केले आहे. 
      या वाघिणीला जोरबंद केल्यामुळे परिसरातील लोकांनी वन विभागाचे अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]