आरोपी पकडताच संतोष रावत यांनी दिली "ही" प्रतिक्रियाया हल्ल्यामागील नेमके सूत्रधार कोण? हे जगजाहीर झाले पाहिजे यासाठी आरोपीचे नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे नेते मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी केली. गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडल्यानंतर संतोष रावत यांनी ही मागणी केली. ज्याा कारणाकरिताा आरोपींनी गोळीबार  केल्याची पोलिसाजवळ कबुली  त्यावरून अनेक प्रश्न आता निर्मााण होत आहे.  
11 मे रोजी संतोष रावत यांच्यावर गोळीबार करण्यात आला त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली होती. आरोपींना पकडा या मागणीकरिता जिल्ह्यातील राजकीय दबावही पोलिसांवर वाढला. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक यांनी गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक यांच्याकडे सोपविताच, दोन दिवसात त्यांनी राजबीर यादव व त्याचा भाऊ अमर यादव यांना पकडले. आरोपींनी गोळीबार केल्याची कबुलीही दिली. वेकोलीत नोकरी लावून देण्यासाठी अडीच वर्षाच्या आधी संतोष रावत यांना सहा लाख रुपये दिले होते मात्र ते परत न दिल्याने हा गोळीबार केल्याचे त्यांनी कबूल केल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली.


मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचा संशय नागरिकांना असून तसा संशय संतोष रावत यांनीही व्यक्त केला आहे. ज्या आरोपींना आपण ओळखतही नाही अशा व्यक्तीच्या मागे नेमका सूत्रधार कोण आहे याचा उलगडा झाला पाहिजे यासाठी आपली, आरोपीची आणि त्या सूत्रधाराची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी ही मागणी त्यांनी केली आहे.
संतोष रावत आणि वेकोली याचा दुरान्वये संबंध नाही. संतोष रावत हे वेकोली मध्ये साधे कंत्राटही घेत नाहीत. अशा परिस्थितीत वेकोलीत नोकरी देण्याच्या उद्देशाने संतोष रावत यांना कोणत्या आधारे पैसे देईल? असाही प्रश्न निर्माण होत असून, बदनामी करण्याकरिताच आरोपीकडून चुकीचे बयान दिल्याचे बोलल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]