अन्याय निवारण समितीच्या प्रयत्नांना मिळाले यश रक्कमेची अफरातफर करणाऱ्यां ४ आरोपींना अटक

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर तालुक्यात गाजत असलेल्या राष्ट्रसंत नागरी सहकारी पतसंस्था मर्या , चिमूर र.न. ८०३ मध्ये रकमेची अफरातफर करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी अन्याय नीवारण समीतीव्दारे साखळी उपोषणाला बसले आहे . त्या उपोषण स्थळाला चिमूर वीधानसभा क्षेत्राचे समन्वयक सतीश वारजुकर यांनी भेट दिली .
राष्ट्रसंत तुकडोजी नागरी पतसंस्था मर्या , चिमूर र.न.८०३ या संस्थेचे दिनांक ०१/०४/२०१२ ते दिनांक ३१/३/२०२१ या ९ वर्षाच्या कालावधीमध्ये रू.७ ,६६, ९०,५१० रकमेची अफरातफर करण्यात आली असुन पोलीस स्टेशनला चिमूर येथे ३०/०९/२०२२ ला तक्रार दाखल केली होती. जवळपास ६ महीन्याचा कालावधी पर्यंत कोणतीही कारवाई केली नाही परंतु आज  सकाळी  वरील  रक्कमेची अफरातफर करणाऱ्या वेक्तीना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे त्यामुळे तात्पुरता उपोषण आदोलन स्थगित  करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]