अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्यार्थिनी जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्यार्थिनी जखमी

तळोधी (बा.) : 
   तळोधी येथील महात्मा फुले महाविद्यालयात अकरावीचे क्लास करण्यासाठी सायकलने जात असलेल्या विद्यार्थिनीस एका अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. यात ती गंभीररित्या जखमी झाली. ही घटना गुरुवारी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास घडली.
            प्राची किशन शेंडे (१७, रा. ओवाळा) असे जखमी मुलीचे नाव आहे. नेहमीप्रमाणे ती सायकलने महाविद्यालयात शिक्षणासाठी जात ओवाळा बसस्थानकाजवळ नागभीडकडून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने प्राचीला मागून धडक दिल्याने ती खाली पडली. तिच्या पायावरून ते चारचाकी वाहन गेल्याने गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत तिला ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेनंतर पीकअप वाहनचालक वाहन घेऊन पसार झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]