प्रशासकीय भवन मुल मधील सभागृहात अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर संपन्न
मूल 
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग मुल,  तहसील कार्यालय मुल यांचा सयुंक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर स्त्री शक्ति समाधान शिबिर मुल प्रशासकीय भवन मुल मधील सभागृहात सोमवारला  दि 22 मे रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न झाले.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून स्त्री शक्ति समाधान शिबिरास सुरुवात झाली. या शिबिरासाठी उपस्थित असलेल्या महिलाना तहसिलदार डॉ.रविंन्द्र हेाळी., महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी निलेश चव्हाण, नायब तहसिलदार ओकांर ठाकरे,, , महिला बाल कल्याण पर्यवेक्षिका यांच्या सह पंचायत समितीचे ,नगर परीषदचे, भुमि अभिलेख ,कुष्ठरोग तंज्ञ,कर्मचारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व महिलाना शासनाच्या विविध योजनाची माहिती सविस्तर देत त्यांचे फायदे समजून सांगितले. यात प्रामुख्याने कृषी, महसूल या विभागासह पंचायत समिती आखत्यारीत असणाऱ्या महिलासाठीच्या वेगवेगळ्या योजनाची माहिती देण्यात आली.

तसेच शिबीरामध्ये सर्व शासकीय विभागाचे स्टॉल्स उभारून या स्टॉल्समध्ये संबंधित विभागांच्या योजनांचे फलक, भित्तीपत्रके, माहितीपुस्तके, घडीपुस्तिका, पोस्टर्स आदी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात आजयावेळी महिला,अंगणवाडभ्स्था सेवनिक लोकप्रतिनिधी व अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमात विविध विभागांच्या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.

तसेच या प्रसंगी संपूर्ण तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलाच्या अडचणी त्या-त्या विभागातील अधिकाऱ्यांनी समजावुन घेऊन त्यावर योग्य ते मार्गदर्शन करत त्यांचा शंकाचे निरसन केले

तहसीलदार डॉ रवींद्र होळी यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनचरित्राचा परिचय करुन देत त्यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्याच्या अम्रुतमहोत्सवी वर्षात करुन महिला सक्षमीकरण व सबलीकरण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे त्या संधीचा महिलांनी फायदा घेऊन आपल्या प्रगतीचा मार्ग सुकर करून घ्यावा त्यासाठी लागणारी मदत आमचे सगळ्या विभागाचे अधिकारी करतील अशी आशा व्यक्त केली ,व या शिबिरात उपस्थित प्रत्येकाने २-३ लोकांना जरी ही माहिती पुरवली तरी या शिबिराचे फलित झाले असेही समजता येईल असे तहसीलदार डॉ होळी ,यांनी स्पष्ट केले.

या शिबिरा मध्ये महिला-बालविकास, पंचायतसमिती, महसुल विभाग, कृषी- विभाग , आरोग्यविभाग, शिक्षणविभाग, नगरपरीषद, इत्यादीसह अन्य शासकिय विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते.
यात महिला कडून त्यांच्या समस्या विषयी माहीती फार्म द्वारे घेऊन त्या सोडविण्या करीता संबधित विभागाचे प्रतिनिधी मार्गदर्शन करून समस्यांचे समाधान करणार आहेत. त्यामुळे या शिबिराचा लाभ तालुक्यातील महिलांनी घेऊन समस्यांचे समाधान करावे असे आवाहन महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी निलेश चव्हाण मूल यांनी केले होते ,मात्र स्त्रीशक्ती विकास कार्यक्रमात महिलांच्या अनुपस्थितीमुळे तब्बल एक तास उशिरा आंगणवाडी कार्यकर्त्यां व आशावर्कर यांना सभागृहात बसवून कसाबसा कार्यक्रम पार पाडला गेला. याबाबतीत कारणमीमांसा होणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र होळी, तहसीलदार मूल होते तर प्रमुख अतिथी म्हणून ,चनफने,सहा.गटविकास अधिकारी मूल ओंकार ठाकरे नायब तहसीलदार मूल ,डॉ. थेरे तालुका आरोग्य अधिकारी , चौधरी, कृषी अधिकारी पं.स.मूल ,टिपरे म्याडम, शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.मूल, आदींची उपस्थिती होती.

विविध विभागांच्या स्टालला भेटी देत अतिथींनी सभागृहात प्रवेश केला, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली , स्वागत समारंभानंतर प्रास्ताविक निलेश चव्हाण बालविकास प्रकल्प अधिकारी मूल यांनी केले.तर संचालन बबिता गुंडाने यांनी केले आणि उपस्थित मान्यवरांनी आपापल्या विभागांची माहिती देण्याचा प्रयत्न केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]