सावरी (बिड) येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुरु असलेले काम निकृष्ट दर्जाचे - ग्राम पंचायत सदस्य दिलीप मोटघरे

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - शासनाच्या जल जीवन मिशन योजनेतून अनेक गावांना मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरी मुबलक पाणी मिळण्यासाठी जल जीवन मिशन हि योजना राबविण्यासाठी शासनाने भरपूर निधी उपलब्ध करून देण्यात आला.त्याच योजनेतून चिमूर तालुक्यात सावरी (बिड) येथिल जल जीवन मिशन योजनेचे कामे शासनाचे नियम बाह्य पद्धतीचे असून त्या नियमाला केराची टोपली दाखवली जात आहे. अंदाजपत्रक (इस्टिमेट) नुसार कुठलेही बांधकाम होताना दिसत नाही. सरकार करोडो रुपये विकासासाठी देत असतो. जल जीवन मिशन  योजनेच्या विकास कामात सावरी येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सावरी बिडकर येथिल सरपंच लोकेश रामटेके ग्रा.प. सदस्य दिलीप मोटघरे ग्रा.प.सदस्य आशिष घानोडे  यांनी आरोप केला आहे.अनेक नवीन जलजीवन योजनेत पाईप लाईन जमिनीत तीन फूट खोल नाली करून टाकायचे असते पण सावरी येथे उलटे चित्र दिसत आहे. हि पाईप लाईन दोन फूटावरच टाकने सुरू आहे. व टाकीच्या बांधकामासाठी माती मिश्रित रेती सुध्दा वापरण्यात येत आहे. जल जीवन मिशन योजना यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी इंजिनियर सुद्धा डोळे झाक करून याकडे दुर्लक्ष करीत आहेत. प्रत्येक कामातून यांना काही टक्केवारी दिल्या जात असेल अशी स्थानिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. मग ठेकेदार  या कामातून कोण - कोण त्या व्यक्तीला किती टक्केवारी दिली जाते यांची चौकशी झालीच पाहिजे आणि चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथील जल जीवन मिशन कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकारी यांचेवर कारवाई करण्यात यावे.तसेच या निकृष्ट दर्जाचे काम पास करणाऱ्या इंजिनियर ला नौकरी वरुन काढण्यात यावे. ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी सरपंच लोकेश रामटेके, ग्रा.प.सदस्य दिलीप मोटघरे,ग्रा.प.सदस्य  सौ.किरण मेश्राम, सौ.सुरेखा शेबेकर,यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]