मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर अभियान

   

    मुल - केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर हे अभियान दिनांक १५ मे २०२३ पासून पूढील ३ आठवड्यांच्या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतला असून या अभियानांतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज समस्थाना रिडयूस,रियूज आणि रिसायकल सेंटर म्हणजेच रिरिरे केंद्र स्थापन करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

त्यानूसार नगर परिषद मूल कार्यालयात दिनांक २० मे २०२३ पासून दिनांक ५ जून २०२३ पर्यंत रिडयूस,रियूज आणि रिसायकल केंद्र स्थापन करण्यात आलेले असून त्याचे उदघाटन श्री.अजय पाटनकर मूख्याधिकारी नगर परिषद मूल यांचे हस्ते पार पडले.
या केंद्राअतर्गत शहरातील नागरीकांनी वापरलेली जूनी पूस्तके,प्लॉस्टीक वस्तू खेळणी ,कपडे आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पूनर्वापर, नुतनीकरण किंवा नवीन उत्पादने तयार करण्यात येणार आहे.

तरी शहरातील नागरीकांनी वापरलेली जूनी पृस्तके, प्लॉस्टीक वस्तू, खेळणी,कपडे आणि इतर निरुपयोगी वस्तू नगर परिषद मूल कार्यालयात रोज सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत जमा कराव्या. असे आवाहन श्री.अजय पाटनकर मूख्याधिकारी नगर परिखषद मूल यांनी केले आहे.
या अभियानाचे यशस्वीते करीता श्री. श्रीकांत समर्थ अभियंता,श्री.अभय चेपूरवार आयेग्य निरिक्षिक तसेच श्री.आलेख बारापात्रे समन्वयक यांनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]