शासकीय औ. प्र. संस्थेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती संपन्न
चंद्रपूर (प्रतिनिधी)- 
    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले. याप्रसंगी संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.  तसेच   जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे आयोजन  संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली   कौशल्यम सभागृहात करण्यात आले.  या कार्यक्रमात रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर यांनी प्रास्ताविक करून  स्वयंसेवकांना तंबाखू सेवन न करण्याबाबतची शपथ दिली.  याप्रसंगी गटनिदेशक श्री. अमित शेंडे, जितेंद्र टोंगे, अविनाश गभणे,सौ. सुनिता गभने आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन कु. कोमल बावरे यांनी केले तर गटनिदेशक सौ. सुचिता झाडे यांनी आभार प्रदर्शन केले.‌
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे निदेशक, स्वयंसेवक, प्रशिक्षणार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]