अखेर पळस गाव खुर्द च्या पुलावर आई व मुलाचा अपघात करून फरार झालेल्या टिप्परसहीत चालक व मालकास अटकयश कायरकर, तालुका प्रतिनिधी,
तळोधी बा:
           
          २० मे च्या रात्री ११.३०   तळोधी बा. पासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या पळस गाव खुर्द बोकोडोह नाल्यावरती अज्ञात टिप्पर वाहनाने जोरदार धडक दिल्याने,सिदेंवाही -लोनवाही येथील त्रिवेणी नगरात राहणारे बुलेट बाईक वर बसलेल्या मुलगा समिर रमाकांत कडयालवार वय ३० वर्ष (मुलगा) व आई कल्पना रमाकांत कडयालवार वय ५२ वर्ष यांचे जागीच मृत्यू , तर कार मध्ये असलेल्या  वडील रमाकांत पांडुरंग कडयालवार वय ६२ वर्ष गंभीर जखमी असा   पध्दतीने विचित्र अपघात करून चालक टिप्पर वाहन घेऊन फरार झाला होता. 
           


    सदर घटना नागभीड पोलीस स्टेशन हद्दीत झालेली असताना तळोधी बा. पोलीस स्टेशन नवनियुक्त ठाणेदार मंगेश भोयर व नागभीड पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव कोरवते साहेब यांनी संयुक्त रित्या तपास करून अपघातानंतर या मार्गावर नागभीड कडून सिंदेवाही कडे जाणाऱ्या वाहणाचे सि. सि. टि. व्ही. कॅमेरा फुटेज द्वारे नोंद घेतली असता पिवळा रंगाचे टिप्पर वाहन असल्याचे आढळून आले होते.  तळोधी बा. पोलीस विभागाने  जलद गतीने तपास वाढवून पुन्हा तळोधी नागभीड व नागपूर मार्गावर धावणाऱ्या   टिप्पर चे भिवापूर रोडवरील संपूर्ण सि. सि. टि. व्ही फुटेज द्वारे तपासणी केली असता अपघात करून फरार झालेले  पिवळ्या रंगाचे टिप्पर वाहन नागपूर येथील के. एस. मोटर्स. वाठोडा, खरबी,रोड.नागपुर येथे दुरुस्ती करण्यासाठी नेण्यात आले असल्याचे माहिती मिळाली. पोलिसांनी तपास केला असता बोकोडोह नाल्यावरती बुलेट बाईकवरून सफारी करणारे आई व मुलगा व मागे हून चारचाकी वाहनाने येणारे वडिलांचे  याचअज्ञात टिप्पर वाहन क्र. Mh. 40-BG 3782  ने जोरदार धडक दिल्याने आई व मुलगा हे जागीच ठार झाले होते, तर वडील गंभीर जखमी झाले होते, असा भिषण अपघात करून फरार झाला होता.     
 
            टिप्पर वाहन चालक प्रकाश तुळशीराम मेश्राम वय 34 वर्ष. रा. वेलसाखरा. तह उमरेड जि. नागपूर व टिप्पर मालक दिवाकर ताराचंद खाटिक वय 42 रा. चापां तह. उमरेड जि. नागपूर यां दोघांवर कलम, 304अ,279,337,338, आय.पी.सी.सहकलम 184,134,177 मोटार वाहन कायदा व 201 व202 पुरावा नष्ट करणे व माहिती देण्यास टाळाटाळ करण्यावरून कारवाई करण्यात आली. टिप्पर वाहन सहित अटक करण्यात आली.
      वरील कारवाई नागभीड पोलीस स्टेशन सहाय्यक निरीक्षक वैभव कोरवते, तळोधी बा. पोलीस स्टेशन ठाणेदार मंगेश भोयर, तळोधी बा. पोलीस स्टेशन पी. एस. आय. सहदेव गोवर्धन, हसरांज सिडाम,पोलीस हवालदार एस. सी. देव्हारे, संजय मांढरे. सचिन साखरकर यांनी परिश्रम घेऊन तपास पूर्ण करून कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]