कंत्राटी सफाई कामगाराकडून वैद्यकीय उपचार?

कंत्राटी सफाई कामगाराकडून वैद्यकीय उपचार
"त्या" वायरल व्हिडिओने सर्वत्र खळबळ


मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा पुरावा पुढे येत असून, वायरल झालेल्या व्हिडिओतून उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी रुग्णांचे जीवांसोबत कसे खेळत  आहे याचा उलगडा होत आहे.
वायरल व्हिडिओ मूल येथील वार्ड नंबर 17 मधील संतोष कमलापूरवार यांचेवरील उपचारांचा असल्याची माहिती आहे.  तो जखमी झाला.  त्याच्या पायाला मोठी जखम झाली होती. उपचारासाठी तो उपजिल्हा रुग्णालय मुल येथे गेल्यावर तिथे वैद्यकीय अधिकारी किंवा तज्ञ व्यक्तींनी या रुग्णावर उपचार करायला हवे होते.  मात्र तसे न करता, याच रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगार असलेले संजय रेचनकर हे उपचार करीत असल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसून येत आहे. संजय रेचनकर हे जखमी संतोष कमलापूरवार यांच्यावर उपचार करीत असून त्यांची जखम शिवून टाके मारण्याचे काम देखील करीत असल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे. मूलच्या उपजिल्हा रुग्णालयातील हा व्हिडिओ मार्च महिन्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.


याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी हा प्रशिक्षणाचा भाग असल्याचे सांगितले. कंत्राटी सफाई कामगारास वैद्यकीय उपचार करण्याचे प्रशिक्षण कशाच्या आधारावर दिले जाते या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही हे विशेष!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]