पवनी पोलिसांनी पकडले कत्तलखान्यात जनावरांची वाहतूक करणारे ट्रक

39 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - नाईट गस्तीला असणारे कर्मचारी पवनी पोलीस स्टेशन तसेच लाखांदूर पोलीस स्टेशन यांच्या गुप्त माहितीनुसार अवैध गुरांची तस्करी करणारे ट्रक हेे सतत याच मार्गे जात असून लाखांदूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी जवळपास भंडारा लाखांदूर शिंदपुरी टी पॉईंट पर्यंत पाठलाग करून लाखांदूर पोलीस स्टेशन व पवनी पोलीस स्टेशन या दोघांच्या संगमने गुरांचे वाहतूक करणारे वाहन पकडण्यात यश प्राप्त झाले. व पवनी पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. साखरकर यांनी घटनास्थळावरून फोन करून आपले वरिष्ठ अधिकारी नरेंद्र निस्वादे  निरीक्षक यांना बोलावून दोन्ही एल.पी. ट्रक वाहन पोलीस स्टेशन पवनी येथे जमा करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. 
आणि कारवाई हि पोलीस स्टेशन पवनी येथे अप.क्र. 189/2023 कलम 11(1) (ड) (घ) प्रा.कृ.अधि सहकलम 9 प्रा. संरक्षण अधिनीयम सहकलम 119 म.पो.का. फिर्यादी - पो.शी. संभाजी शंकरराव हाके ब.न.542 पोलीस स्टेशन पवनी जि.भंडारा आरोपी क्रमांक (1) झनकलाल हृदयसिंग मरकाम वय 30 वर्ष रा. नालंदा नगर नागपुर (2) कुदंन विदेशीलाल शहारे वय 32 वर्ष भंते आनंद नगर पिली नदी कामठी रोड नागपुर घटणास्थळ - मौजा सिंदपुरी फाटा पवनी 2 कि.मी. उत्तर घटणा दिनांक. 28/05/2023 चे 02/30 वाजता दरम्यान दाखल दिनांक. 28/05/2023 चे 13.44 वाजता मिळालेल्या माल एकुन 99 जनावरे प्रत्येकी कि. 10,000 रु प्रमाने एकुण किमती 9,90,000 रु व दोन ट्रक प्रत्येकी किंमत 15,00,000रु प्रमाने 30,00,000 असा एकुन 39.90,000/- रु चा माल.प्रकरण अशा प्रकारे आहे की, नमुद घटना. ता. वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी हे नाईट गस्त चेकिंग ड्युटीवर असता  त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पंचासमक्ष रेड केली असता ट्रक क्र. एम.एच.40 ए.के. 3933 चा चालक याने आपल्या ताब्यातील वाहनामध्ये 17 पांढ-या रंगाचे गोरे , 21 लाल रंगाचे गोरे , 2 काळ्या लाल रंगाचे गायी , 3 काळे पांढरे गोरे ,  6 काळ्या रंगाचे गोरे असे एकुन 49 गौवंश जनावरे व ट्रक क्र. एम.एच.40 ए.के. 3933 मध्ये 25 लाल रंगाचे गोरे ,  3 काळ्या रंगाचे गोरे , 16 पाढ-या रंगाचे गोरे , 1 लाल काळ्या रंगाचा गोरा , 3 काळे पांढरे गोरे , 2 लाल पांढरे गोरे असे एकुन 50 गौवंश जातीचे जनावर त्यांना वाहनामध्ये चारा पानीची व्यवस्था न करता दाबुन, कोंबुन निर्दयतेने असे एकुण 99 जनावरे प्रत्येकी कि, 10,000 रु प्रमाणे एकुन किंमती 9,90,000 रु चे दोन ट्रक प्रत्येकी किमती 15,00,000 रु प्रमाने 30,00,000 /- रुपयाचे ट्रक मध्ये असा एकुण 39,90,000/-   रुपयाचा आहे, बिना पास परवाना अवैधरित्या वाहतुक करतांनी मिळुन आल्याने फिर्यादिचे लेखी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.या घटनेने पवनी तालुक्यात मोठी चर्चा रंगली असून पोलीस प्रशासनाने या केलेल्या कारवाई चे विविध ठिकाणी स्तुती केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]