नवेगाव बफर क्षेत्रात मुरुमाचे मोठे - मोठे खड्डे वन्यप्राण्यासाठी जीव घेणे

बफर झोन क्षेत्रात ठिक - ठिकाणी मुरूम रेतीचे खड्डेच - खड्डे पडल्याने वन्य प्राणी धोक्यात

बफर वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कसे ?

उप संपादक 
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमुर तालुक्यातील खडसंगी बफर वन परिक्षेत्रात मुरुम तस्करी ला उधाण आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बफर वन परिक्षेत्रात मुरुमाचे मोठे - मोठे खड्डे पडले आहे. हे मुरुम पर्यटक सफारी करीत असतात त्या मार्गावर टाकले जाते. याची कसल्याही प्रकारची रॉयल्टी नसते अशावेळी अधिकारी यांना विचारणा केली असता हे नियमात आहे असे उत्तरे दिली जात असतात.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यातील प्रसिद्ध गेट म्हणून नवेगाव बफर आहे.या नवेगाव प्रवेशद्वारा जवळ काही अंतरावर असलेल्या झरना रिसोर्ट च्या अगदी बाजुला तलावामध्ये kcc रोड कंपनी ची हायवा ट्रक व दोन पोकलँड मशीनीद्वारे दिवस - रात्र  मोठ्या प्रमाणावर मुरूमाचे उत्खनन सुरू असून त्यामुळे जंगलात आणि जंगल भागात मोठ - मोठे खड्डे पडले आहे.त्याच ठिकाणी वन्य प्राण्याचे वास्तव नेहमीच असते छोटा मटका हा त्याठिकाणी नेहमीच बघायला मिळते. पर्यटकांना अनेकदा मटका या वाघाचे दर्शन होत असते. आणि बफर झोन च्या रस्त्याची क्षमता नसतांना हायवा सारखे जड वाहन यांना परवानगी दिली गेली तरी कशाप्रकारे याचा अजूनही उलगडा लागलेला नाही ? गेल्या सोमवारी मुरुमाचे खड्डे असलेल्या ठिकाणांच्या रोडवर छोटा मटका बसुन असताना टिपलेले छायाचित्र सोशल मीडियावर वायरल झाले होते.आणि झरना रिसोर्ट च्या बाजूला मुरुमाच्या मोठ - मोठ्या खड्यांमुळे भविष्यात वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात येवु शकतात तर पोकलँड आणि हायवा वाहनांच्या दिवस रात्रीचा उत्खनन करते वेळेस वाहतुकीच्या वेळेस च्या वाहनांच्या आवाजामुळे झरणा रिसॉर्ट येथील पर्यटक तसेच वन्य प्राण्यांना याचा त्रास होत असून खडसंगी बफर चे अधिकारी यांचे दुर्लक्ष का ? व वरिष्ठ बफर च्या अधिकाऱ्यांचे सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष कसे ? वन परिक्षेत्रातील मुरुमाचे अनेक विषय आहेत. याबाबत अनेकदा बातम्या पण वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आल्या तसेच वेब पोर्टलवर सुद्धा बातम्या प्रकाशित केल्यानंतर या अवैध मुरुमाचा उपसा करनारे अधिकारी स्वार्थापोटी, राजकीय, लोकप्रतिनिधींच्या दबावापोटी दंडात्मक कारवाई करण्यास दिरंगाई करण्यात येते असे बरेच प्रकरण तालुक्यात पहावयास मिळते आहे. परवानगी देणारे अधिकाऱ्यांवर व kcc कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी व या सर्व प्रकरणाची चौकशी करून वन्य प्राण्यास समोर धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]