वाघांचे हल्यात एक बैलं ठार, एक जखमी जनकापूर बसस्टाॅप परिसरातील घटना.
तळोधी (बा.) 
नागभिड वनपरिक्षेत्रातील जनकापूर शेतशिवारात पट्टेदार वाघाने हल्ला करून एक बैलं ठार केला तर एक जखमी केल्याची घटना आज उघटकिस आली असुन जनकापूर बसस्टाॅप परीसरात वाघाचे अस्तित्व असल्याने शेतकरी वर्गात दहशत पसरली आहे.
 जनकापूर बसस्टाॅप परिसरात गेले अनेक दिवसांपासून पट्टेदार वाघांचे वास्तव्य आहे. अनेका़ना या वाघाने दर्शन दिले आहे. मात्र काल (ता.१८ ला) दुपारी ३ वाजताचे दरम्यान सावरकर या़चे शेत गट न. १३० मधे मधुकर मंडलवार यांचे दोन गिर जातीचे बैल शेतात नेहमी प्रमाने चारा खात होते. दबाधरून बसलेल्या पट्टेदार वाघाने  दोन बैलांवर हल्ला केला त्यात एक ठार झाला. तर एक जखमी अवस्थेत घरी परत आला. त्यामुळें या मजूर शेतकऱ्यांचे तिस हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असता घटनास्थळी वनरक्षक गुरूदेव नवघडे यांनी मैका पंचनामा करून आर्थिक नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांची  नुकसानीची माहिती वनविभागाकडे सादर केली आहे. या परिसरातील या पट्टेदार वाघांचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जनकापूर पळसगाव ओवाळा येथिल नागरिकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]