कोण आहे राजबीर यादव?

कोण आहे राजबीर यादव?चंद्रपूर जिल्हयाचे कॉंग्रेस नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांचेवर गोळीबार करणार्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्यांने गुंता सुटण्याची शक्यता असून या प्रकरणी बाबुपेठ येथील दोन भावाना अटक करण्यात आली आहे.  यातील एक आरोपी राजबीर यादव असल्याची माहीती असून, राजबीर यादव हे कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे नजिकचे वर्तुळातील असल्यांने, या गोळीबारास ‘राजकारण’ कारणीभूत आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या भर्तीसाठी दिलेल्या पैसे परत करण्याच्या वादातून हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे.  मात्र ही शक्यता खासदार धानोरकर विरोधात असलेल्या राजकीय नेत्यांना पचनी पडत असल्यांचे दिसून येत नाही.  माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तर, पकडलेल्या आरोपीची नार्को टेस्ट करून, मुख्य सुत्रधाराला शोधण्याची मागणी केली आहे.  त्यांचा नेमका निशाना कुणाकडे आहे, हे सर्वश्रुत आहे.

राजबीर यादवचे राजकीय कनेक्शनराजबीर यादव हे कॉंग्रेसचे जबाबदार पदाधिकारी आहेत. ते चंद्रपूर महानगर कॉंग्रेसचे महासचिव आहेत.  खासदार बाळू धानोरकर यांचे गटातील असून मंडल रेल उपभोक्ता सलाहगार समितीचे (DRUCC SECR Nagpur) चे सदस्य आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ते धानोरकर दाम्पत्यांचा, तसेच कॉंग्रेस पक्षाचा नियमीत प्रचार करीत असतात.

कोण आहेत राजबीर यादव?राजबीर यादव हे पाच पिढ्यांपासून चंद्रपूरातील बाबुपेठ, लालपेठ परिसरात राहत असून, ते पाच भाऊ आहेत.  राजबीर हे मधले असून, त्यांना दोन मोठे आणि दोन लहान भाऊ आहेत.  राजबीर वगळता इतर भाऊ हे छोटे-मोठे व्यवसाय करतात. कुणी ठेकेदारी करतात तर कुणी मोबाईल शॉपी चालवितात. राजबीर हे उत्तम दांडिया कलावंत असून, ते मागील अनेक दशकापासून चंद्रपूर शहरात दांडीयाचे प्रशिक्षण देतात.  त्यांचेकडून दांडीया शिकण्याकरीता चढाओढ असते.  उल्लेखनीय म्हणजे, राजबीर यांचेच पुढाकारातून चंद्रपूरात खासदार धानोरकर यांचेकडून दांडिया गरबा महोत्सव झालेला होता.राजबीर यादव यांनी नेमकी गोळी का झाडली असावी याबद्दल तर्क-वितर्क केल्या जात आहे.  या प्रकरणी 6 लाख रूपये परत न दिल्यांचे कारणावरून गोळीबार केल्याची चर्चा आहे.  मात्र एवढ्याशा रक्कमेकरीता राजबीर गोळीबार करेल यावर त्यांच्या नजिकच्या व्यक्तीना शंका वाटत आहे.  राजबीर यादव यांचा पुर्व इतिहास ‘क्राईम’चा नाही, किंवा त्यांचा स्वभावही मृदु असल्यांने, कुणाच्या सांगण्यावरून ते एखाद्याचा जीव घेण्यास तयार होतील यावरही कुणी विश्वास ठेवायला तयार नाहीत.  त्यामुळे आणखी काही दिवस रावत गोळीबार प्रकरणातील संदिग्धता कायम राहणार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]