रेंगाबोडी येथील सिमेंट काँक्रीट रोड चे काम निकृष्ट दर्जाचे


रॉयल्टी ची रेती न वापरता चोरीच्या रेतीचा पूर्णपणे वापर सुरू

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर वरून अगदी १६ कि.मि.अंतरावर असलेल्या रेंगाबोडी या गावामध्ये सिमेंट काँक्रीट रोड चे काम सुरू आहे. हे काम शासकीय नियमानुसार नसून पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहे.कमी दर्जाचे सिमेंट इंजिनिअर विना काम सुरू मिक्सर मशीन ऑपरेटरच स्वतः तयार करतो सिमेंट काँक्रीट मसाला इंजिनिअर विना व या कामावर टाकण्यात आलेली रेती हि चोरीची आहे याची कुठल्याही प्रकारची रॉयल्टी नाही. या कामावर ग्रामसेवक आणि सरपंच यांचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.या कामाची गुणवत्ता किती याचा कुणीही अंदाज लावू शकणार नाही असे हे काम असून या काँक्रीटीकरण रोड ची चौकशी व्हायला हवी व इंजिनिअर तथा कंत्राटदार यांच्यावर कारवाई व्हायला हवी.तलाठी व तहसीलदार यांनी रेतीच्या रॉयल्टी बद्दल विचारणा करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]