जांभुळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं मनमानी कारभार

येणाऱ्या रूग्णाना सहन करावा लागतो नाहक त्रास

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग )

चिमुर : - चिमूर तालूक्यात येत असलेल्या जांभुळघाट प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांचेमुळे काही दिवसा पासुन मनमानी कारभार चालु आहे.आज दिनांक.२५/०५/२०२३ ला सकाळचे ०९:०० वाजता दवाखाण्याचे दार बंद अवस्थेत असल्याने रूग्णाना फेऱ्या मारावे लागत आहे. जांभुळघाट येथे प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये दोन MBBS डॉक्टराची पोस्टींग असुन येमरजंसी साठी २४ तास एकतरी डॉक्टर असने आवश्यक आहे.मोठा आरोग्य केंद्र असल्याने सभोवतालच्या गावाचे रूग्ण येत असतात. रूग्णाची काळजी घेणे डॉक्टर व कर्मचारी यांची जबाबदारी असते पण आपली जबाबदारी पुर्ण पणे न बागळता निस्काळजी पणे वागताना दिसत आहे.या सर्व बाबी  वरीष्ठ अधिकाऱ्यानी चौकसी करून कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी स्थानिक नागरीक व  रुग्णांकडूण मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]