चारगाव खुर्द येथे जय हिंद पानपोई चे उद्घाटन संपन्न...
वरोरा.. जगदीश पेंदाम 
  
तालुक्यातील येत असलेल्या चारगाव खुर्द येथील बस स्टॅन्ड चौरस्ता येथे प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची अडचण अनेक दिवसापासून भेडसावत असून तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे प्रवाशांना पिण्याचे पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे याची दक्षता घेत समाजसेवक अभिजीत पावडे यांनी जय हिंद पाणीपोईची व्यवस्था करून उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला...
 चिमुर - वरोरा या 353 राष्ट्रीय महामार्गावर  चारगाव खुर्द चौरस्ता असून येथून अर्जुनी, कोकेवाडा, वडधा, बोरगाव, साखरा, वडगाव, आबमक्ता, या मार्गावरील प्रवाशांना चारगाव खुर्द येथूनच प्रवास करावा लागत असून प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता.ही समस्या लक्षात येताच चारगाव खुर्द येथे जय हिंद पान पोई चालू करण्यात आली यावेळी उद्घाटक म्हणून शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किशोर पिरके तसेच वडधा गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्रीहरी लेडांगे व चारगाव गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष गजाननराव कष्टी,जेष्ठ स्वयंसेवक जनार्धन पावडे,दयाराम नन्नावरे,ईश्वर सोनेकर,ऋषी बुराण, गोविंदरावजी कष्टी, दामोधर पावडे,आनंद गणोरकर, ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ गायकवाड,अजय बगडे,दिलीप बोदाणे,आदर्श शेतकरी पुरस्कार  सुरेश गरमडे,सेवा ग्रुप फाउंडेशन सचिव अनुप पावडे,दिवाकर बोडे, महेश  शास्त्रकर,अरुण नैताम, विलास कष्टी,सचिन लेडांगे,चंदू पेचे,विशाल पावडे, सचिन डुडुरे, मनोज शेळकी,  महादेव निकोडे, दशरथ देहारकर, अरविंद मोरे,राहुल झुंबाडी, सतीश कुंभारे, लहुजी देहारकर, तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]