मान्सून पूर्व नाल्या स्वच्छ करा.. नालासहित केरकचरा रस्त्यावर...
वरोरा..... उन्हाळ्यातील मे महिना समाप्त होत असून 25 तारखेपासून पाऊसाची रोहिणी नक्षत्राला सुरुवात होत आहे तरीसुद्धा मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामाला अद्यापही मुहूर्त ठरलेला नाही, तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये प्लॅस्टिक, कचऱ्यांनी भरलेल्या असून ठिकठिकाणी शेणखताची ढिगारे पाहायला मिळत आहे याकडे ग्रामपंचायत पदाधिकारी व पंचायत समिती अधिकाऱ्यांची दुर्लक्ष होताना दिसत आहे त्यामुळे भाऊसाहेब मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या बिगुल वाजणार कधी असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहे....

काही दिवसा अगोदरच अवकाळी पावसाने मोठा प्रमाणात ग्रामीण भागात हजेरी लावली त्यामुळे ग्रामीण भागामध्ये ठीक ठिकाणी पाण्याचे डबके साचून असून पाणी खराब झालेली आहे यंदा पावसाळ्याला लवकरच सुरुवात होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले असून 25 मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरुवात होत आहे, ग्रामीण भागातील नाल्यामध्ये प्लॅस्टिक , केरकचरा ठिकठिकाणी पडलेल्या असून पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, बोरवेल या ठिकाणी गंदगी पसरलेली असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]