पळसगाव खुर्द च्या पुलावर अपघातात आई व मुलाचा मृत्यू.टिप्पर चालक टिप्पर घेऊन फरार.



यश कायरकर, तालुका प्रतिनिधी;
नागभीड;
   नागभीड तालुक्यातील व तळोधी (बा.)  जवळील  बोकोडोड नदीच्या  पुलावर  रात्री ११:३० च्या दरम्यान झालेल्या अपघातात मुलगा रमाकांत कड्यालवार (३०) व आई  कल्पना रमाकांत कड्यालवार (५२) यांचा मृत्यू झाला. तर  वडील  रमाकांत पांडुरंग कड्यालवार (६२) हे गंभीर जख्मी झाले.
    सिंदेवाही-लोनवाही येथील त्रिवेणी नगरात राहणारे श्री रमाकांत कड्यालवार यांच्या गाडीला रात्रौ ११;३० च्या सुमारास तळोधी-बाळापुर  जवळील बोकोडोह नदीवर विचित्र अपघात झाला. नागपूर वरून सिंदेवाही  कडे रात्री मुलाला बुलेट बाईक घेऊन  दिल्यानंतर दुचाकी ने मुलगा साहील गावाकडे येत असताना व त्यांच्या मागे वडिलांची चार चाकी ने येत  होते.  मात्र असताना अचानक बोकोडोह पुलावर मुलाची बुलेट बंद पडल्यामुळे तिच्या मागे आपली गाडी थांबवून असताना  मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने पुलावर ऊभ्या असलेल्या चारचाकी गाडीला जोरदार धडक दिल्याने ती चारचाकीची गाडीसमोर बुलेटवर बसून असलेला त्यांचा लहान मुलगा साहील रमाकांत कड्यालवार (३०) व त्यांच्या पत्नी कल्पना रमाकांत कड्यालवार (५२) यांच्या गाडीला जोरदार ठोस बसल्याने ते पुलावरून खाली पडल्याने  मुलगा व  पत्नीचे या विचित्र अपघातात दुःखद निधन झाले. व चार चाकी मध्ये असलेले वडील गंभीर जख्मी झाले.


    नागपूर कडून सिंदेवाही कडे येणारा अज्ञात वाहन हा टिप्पर असल्याचे अंदाज असले तरी तो अज्ञात टिप्पर चालक हा टिप्पर घेऊन घटनास्थळावरून फरार झालेला आहे . या घटनेची माहिती मिळतात नागभीड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरवते यांच्या मार्गदर्शनात समोरील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.
    विशेष म्हणजे शिंदेवाही तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात नागपूरला व नागपूर परिसरात रात्रंदिवस अवैध रेतीची वाहतूक सुरू असून हे अवैध वाहतूक करणारे ट्रक/टिप्पर चालक है बेधुंद अवस्थेत टिप्पर पळवतात त्यामुळे या रस्त्यावर रात्री च्या वेळी मोठ्या प्रमाणात या अवैध वाहतूक करणारे ट्रक टिप्पर मुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे. याकडे रस्ता वाहतूक व अपघात नियंत्रण विभागाने लक्ष देऊन यावर नियंत्रण आनायला पहीजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]