वाघाच्या हल्ल्यात महिला ठार



  • सावली (रंजिता नायडू)
सावली तालुक्यातील वाघोली बुटी येथे वाघाने हल्ला करून एक महिला ठार केल्याची घटना घडली.

सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उप वनक्षेत्रातील वाघोली बुटी येथे पुन्हा वाघाने हल्ला करून एक महिला ठार केल्याची घटना घडली. एका महिन्यात दुसऱ्यादा घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

वाघोली बुटी येथील प्रेमीला मुकरू रोहनकर ही महिला आज शेतात काम करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने तिला जागीच ठार केले. घटनेची माहीती मिळताच वनविभाग व पोलीस विभाग घटनास्थळी गेले आहे.

यापूर्वी वाघोली बुटी येथील महिला ममता हरिचंद्र बोदलकर (७०) ह्या शेतात काम करण्यास गेल्या दरम्यान काम करत असतांना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला करून काही दूरवर फरफटत नेत ठार केले होते. 

या दोन्ही घटनांमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]