स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या आशिर्वादाने चिमूर तालुक्यात अवैधरित्या KCC कंपनी करीत आहे मुरूमाचे उत्खनन

महसूल प्रशासन झोपेत

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर  तालुक्यातील शिवापूर बंदर येथे कसल्याही प्रकारची मुरुमाची लिज न काढता अवैधरित्या KCC कंपनी हि राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई या मार्गाच्या कामामध्ये माती मिश्रित मुरूम वापरत आहे. हा कायद्याने गुन्हा आहे. एकिकडे नितिन गडकरी यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे कि लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देता येईल परंतु शासकीय कामामध्ये बोगस काम व भ्रष्टाचार नको असे आढळल्यास डोजर खाली चिरडून मरेन अशी घोषणा केली असतांनाही कंत्राटदार ( ठेकेदार ) इंजिनिअर यांना कसलीही भीती वाटत नाही ? ज्या शेतातून माती मिश्रित मुरूम उपसा करण्यात येत असून २०१८ मध्ये याच शेतात महराष्ट्र शासन कृषी व जलसंधारण विभाग  जलयुक्त शिवार अभियान एजनेचा शेतकऱ्याने लाभ घेतला असून याची एकूण रक्कम ४५,३८८ रुपयाचे हे काम करण्यात आले होते. याची काल मर्यादा ८ वर्षे आहे.यामध्ये कसल्याही प्रकारची दुरुस्ती करायची असल्यास संबंधित कृषी विभागाला विचारात घेणे आवश्यक आहे. असे असतांना सुद्धा वारंवार शेतकरी माती मिश्रित मुरूम पैशाच्या लालसेपोटी योजनेचा लाभ घेऊन सुद्धा शासनाला धोक्यात ठेऊन माती मुरूम विक्री सुरू आहे.आणि हे अवैधरित्या मुरूम उत्खनन अनेक दिवसांपासून खडसंगी लगत असलेल्या शिवापूर येथील  सर्वे क्रमांक.६/१ शेतकरी सुधाकर गोमाजी सहारे यांचे शेतातून मोठ्या प्रमाणावर सुरू असून या शेती लगत प्रादेशिक वन क्षेत्र अंदाजे १० मिटर अंतरावर लागून आहे. आणि या वन क्षेत्रातून मोठं - मोठी हायवा ट्रक व पोकलँड मशीन ने दिवस - रात्र मुरूमाचे उत्खनन सुरु आहे.या उत्खननाणे वन्य प्राणी यांना त्रास होत असून वन्य प्राणी यांचे हे वास्तव्याचे तसेच दैनंदिन ये जा करण्याचे हे ठिकाण व मार्ग आहे. अवैध रित्या मुरूम उत्खनन करण्यात आलेले खड्डे यामुळे वन्य प्राणी यांचे जीव धोक्यात आले आहे. प्रादेशिक वन विभागाने तसेच महसूल विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून फौजदारी गुन्हा दाखल करून शेतकरी तथा KCC कंपनीवर दंडाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवापूर वासीयांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]