डोणी - 1 डोणीत पाण्यांची भिषण टंचाई - प्यावे लागते गढूळ पाणी water crisis

डोणीत पाण्यांची भिषण टंचाई - प्यावे लागते गढूळ पाणीमूल लगत असलेल्या, चंद्रपूर तालुक्यातील डोणी गाव तसं किर्र जंगलासाठी प्रसिध्द आहे. गावच्या चारही बाजुने जंगलाने वेढलेले हे गांव, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे TATP सीमेवर आहे. 95 आदिवासी trible people कुटूंबाचे डोणी हे गांव सध्या पिण्यांच्या पाण्याच्या भिषण टंचाईला तोंड देत आहे. Water crisis 

गावात तीन विहीर, तीन बोअरवेल आहेत. तीनही विहीरी आटल्या असून, आता डोणीच्या महिलां याच विहीरीतील तळाशी असलेला गाळयुक्त पाणी काढून पाण्याची अडचण कशीतरी भागवित आहे. जंगलातून येणारा गावच्या शीवेजवळीत नाला हेच डोणीसाठी नैसर्गीक पाण्याचे स्त्रोत आहे. या नाल्यावरील नळयोजना मागील अनेक वर्षापासून पूर्ण होत नसल्यांने गावकÚयांना घरातील नळासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

विहीरीतील पाणी आटल्यांने, चाळीस-पन्नास फुटावरील विहीरीतून अर्धी बकेटही पाणी येत नसल्यांने, महिलांच्या डोळ्यात पाणी येत आहे.

गावात सहा वर्षापूर्वी आरओ मशीन लावले होते. ही मशीन दोन-चार महिणे चांगली चालली, मात्र त्यानंतर ती बंद पडली, तेव्हापासून कुणी ती दुरूस्ती करायला आलेच नाही.गावातील 40-50 कुटुंबानी एकत्र येत, आपल्याच खर्चातून, श्रमदान करीत नाल्यातून पाईप टाकीत, सिंटेक्स टाकीच्या माध्यमातून नळयोजना सुरू केली, मात्र गावातील नळयोजनेचे काम करणाÚया कंत्राटदाराकडून गावकÚयांनी तयार केलेली पाईपलाईन जेसीबीने फुटल्यांने, ही योजनाही बंद झाली आहे. अनेकदा विनंती करूनही, कंत्राटदारानी ही पाईपलाईन दुरूस्ती केली नाही.

जिल्हा परिषदेकडून ZP मागील चार-पाच वर्षापासून नळयोजनेचे काम सुरू आहे, मात्र ती अजूनही पूर्ण न झाल्यांने, गावकÚयांना गढूळ पाणी पिल्यावाचून पर्याय नसल्यांचे मत गावकरी करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]