दिवगंत खासदार बाळू धानोरकर यांची ती इच्छा अधूरी!!

दिवगंत खासदार बाळू धानोरकर यांची ती इच्छा अधूरी!राज्यातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर Balu Dhanorkar यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे निधनामुळे लोकसभेत महाराष्ट्र ‘कॉंग्रेसमुक्त’ झाला. खासदार बाळू धानोरकर हे अनंतात विलीन झाले असले तरी, त्यांची एक अपुरी राहीलेल्या इच्छेची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांचे विरोधात थेट वाराणसी Varanasi लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्यांची त्यांनी घोषणा केली होती. पक्षाने फक्त आदेश द्यावाए वाराणसीत जाऊन लढायची ताकद माझ्यात आहे असे ते बोलले होते.

बाळू धानोरकर यांनी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी याना आव्हान देवूनच थांबले नव्हते तर, त्यानंतर त्यांनी, थेट वाराणसीचा दौराही केला होता. वाराणसी विमानतळावर त्यांचे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केलेले जंगी स्वागताचे फोटो आणि व्हिडीओही प्रचंड वायरल झाले होते.

बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीला उतरण्याची तयारी दर्शवली होती. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे. असे बाळू धानोरकर यांनी म्हटले होते. भाजप ही आमची पैदाईश आहेण् ज्या पद्धतीने अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प Donold Trump हद्दपार झाले. त्याप्रमाणे मोदींना भारतातून हाकलल्याशिवाय मी राहणार नाही. पुढील लोकसभा निवडणुकीला अद्याप तीन वर्ष बाकी आहेत. पक्षाने फक्त आदेश द्यावा, वाराणसीत जाऊन लढायची ताकद माझ्यात आहे. आगामी तीन वर्षांच्या कालखंडात धानोरकर तुम्ही वाराणसीत जा. असा आदेश पक्षाने द्यावा. जर मी गेलो नाही आणि मोदींचा ट्रम्प केला नाही तर नाव बाळू धानोरकर सांगणार नाही. असे सांगत बाळू धानोरकर यांनी एकेकाळी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्त्वाविरोधात दंड थोपटले होते.

बाळू धानोरकर यांचे आकस्मिक निधन झाले आणि त्यांनी दिलेले आव्हानही त्याचसोबत संपुष्टात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]