ग्रा.पं. येणोली माल तर्फे आज अहिल्याबाई होळकर पुरस्कार सोहळातळोधी (बा.);
 नागभिड तालुक्यातील ग्रा. पं. येणोली (मा.) तर्फे काल अहिल्याबाई होळकर पुरस्कार सोहळा ग्रामपंचायत  मध्ये घेण्यात आला. 
       या पुरस्काराचे मानकरी म्हणून येणोली येथील सौ उषा पांडुरंग सोनवाने, व दुसऱ्या मानकरी धामणगाव चक येथील सौ गीता प्रदीप पाटील यांना शाल श्रीफळ व सम्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.  ग्रामपंचायत येणोली माल अंतर्गत येत असलेल्या धामणगाव चक, धामणगाव माल ,येणोली माल येथील अंगणवाड्यांना ग्रामपंचायत तर्फे अंगणवाडी येथील मुलांना बसायसाठी खुर्ची चे वाटप करण्यात आले.     


           हे वाटप येणोली येथील लोकनियुक्त सरपंच श्री अमोल विनोद बावनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजू झोडे, महादेव इंदूरकर, सौ वर्षी विजय सोनवाने, ज्योती रमेश मेश्राम, संगिता रमेश घुगुस्कर, आशावरकर , संध्या नरेश मडावी ,व अंगणवाडी सेविका मदतनीस रोजगार सेवक,ग्रा. पं. चे संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]