राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात २४ वा वर्धापन दिन साजरा     
 राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य  ह्यांचे सूचनेनुसार दिनांक १०- ०६-०२३ रोज शनिवारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मूल येथे   सकाळी  १० वाजता  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिना निमित्य बल्लारपुर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांचे अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.


      सदर  कार्यक्रमात थोर  महापुरुषांच्या  प्रतिमेला पुष्प माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करून पक्षाचा ध्वज फडकविण्यात आले  ह्यानंतर केक कापून उपस्थित मान्यवरांनी उपस्थित  प्रमुख पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्य शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.


    येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्याकरिता पुढील वजनदार नियोजन ची सुरवात आज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्य आजपासून पुढे लवकरच काही दिवसात  जनतेच्या दारोदारी - वार्डा-वार्डात - गावा-गावात जाऊन जनतेच्या कल्याणासाठी झटून पक्ष जोमात करण्याच्या निश्चय आज पासून शुभ मुहूर्तावर करू असे  राष्ट्रवादी चे नेते सुमीत समर्थ ह्यांनी प्रतिपादन करून उपस्थित पदधिकाऱ्यात जोश वाढवण्याचा प्रयत्न केला !  सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून मूल तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करून वस्ती तिथे पक्ष स्थापन करू असा सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने  निर्धार करण्यात आला.
दिनांक १०- ०६-०२३ रोज शनिवारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मूल येथे  पक्षाचा वर्धापन दिन  बल्लारपुर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांचे अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
अशाप्रकारे वर्धापन दिन कार्यकर्त्यांनी उत्साहित रित्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता व पदाधिकाऱ्यांची  उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँगेस चे नेते बल्लारपुर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत समर्थ , राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष किसन वासाडे , तालुका महिला अध्यक्ष निताताई गेडाम, शहर अध्यक्ष महेश जेंगठे   , तालुका सचीव नंदू बारस्कर , शहर सचिव प्रदीप देशमुख , सोशल मीडिया अध्यक्ष शुभम शेंडे , प्रभाकर धोटे , इंद्रापाल पुणेकर , हेमंत सुपणार , मनोहर शेरकी , बालाजी लेनगुरे , गायकवाड सर , बोरकर सर  अजय त्रिपत्तीवार , महेश कटकमवार,   दिलीप उईके ,  युवा नेते रोहिदास वाढई , दुशांत महाडोळे , सतीश गुरनुले  , राकेश समर्थ , जुगल महाडोळे ,   आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]