विज पडून एकाचा मृत्यू तर चार जण जख्मी

मूल : - तालुक्यातील चांदापूर हेटी येथे विज पडून एकाचा मृत्यु तर चार जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी २ वा. चे दरम्यान घडली. घराकडे परत जात असताना अचानक नैसर्गिक वातावरण खराब झाल्याने प्रमोद लोमाजी लाटेलवार, संजय मारोती नरुले, विनोद सदोबा पाल, वसंत प्रकाश तिवाडे, बाळु तुकाराम तीवाडे आणि येलप्पा श्री गिरीवार हे गांवालगतच्या चिंचेच्या झाडाखाली उभे होते. दरम्यान विजांचा कडकडाटात सहा जण उभे असलेल्या चिंचेच्या झाडावार विज पडल्याने प्रमोद लाटेलवार ३२ वर्षीय युवकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर उर्वरीत पाचही जण जखमी झाले. या घटनेची माहीती मिळताच ग्रामस्थांनी धावापळ करून जखमींना सहकार्य करून उपचारार्थ उप जिल्हा रुग्णालयात हलविले. मृतक प्रमोद लाटेलवार हा विवाहीत युवक गांवालगतच्याच एका बार मध्ये नोकर होता. काळाने अचानक डाव साधल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यु झाला. घटनेची माहीती होताच प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. रविंद्र होळी यांनी सहका-यांसह घटनास्थळी भेट दिली. दरम्यान मृताक प्रमोद लाटेलवार याच्या कुटूंबास व जखमींना नियमानुसार शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी विनंती उपसरपंच अशोक मार्गनवार यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]