निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न..

निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न..


वरोरा...... जगदीश पेंदाम
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोर अंतर्गत येणाऱ्या वडाळा, घोसरी, काटवल, सोनेगाव, अर्जुनी तुकुम  या गावातील जंगलालगत क्षेत्रातील अग्नि रक्षक, कुटी गेट मजूर, मदतनीस, पीआरटी टीम यांचा निरोप समारंभ कार्यक्रम वडाळा वनपरिक्षेत्र कार्यालय या ठिकाणी घेण्यात आला...

ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोरमध्ये उन्हाळ्यामध्ये लागत असलेल्या आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोर जंगलालगत असलेल्या गावातील नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रोजगार देण्यात येते, सन 2023 मध्ये काम करणारे रोजंदारी कामगार पूर्णता आगीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये यश प्राप्त केले,15 जानेवारी ते 15 जून पर्यंत हे कामगार जंगलात काम करत असताना आपले काम यशस्वीरित्या पूर्ण करत निरोप घेतला आहे....
 या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शंकर भरडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून वनपाल नन्नावरे सोनेगाव, वनपाल कामटकर काटेझरी, शालिक गजबे, मोतीराम शेंडे हे असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपाल कामटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद कोयचाडे यांनी केले....
यावेळी उपस्थित वनरक्षक जुडे, वगारे, लटपटे,कोयचाडे, वन कर्मचारी, अग्नि रक्षक,कुठी गेट मजूर ,मदतनीस, पीआरटी टीम, आदी उपस्थित होते....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]