सेल्फ स्टडी करत कल्पेशने सीईटी परीक्षेत मिळविले उत्तम यश

 सेल्फ स्टडी करत कल्पेशने सीईटी परीक्षेत मिळविले उत्तम यश

 तळोधी(बा) 16/06/2023
    तळोधी(बा) लगत असलेल्या नवानगर येथील कल्पेश शंकर मेश्राम याने सीईटी प्रवेश परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले आहे.तळोधी(बा) येथील सामान्य कुटुंबातील शंकर मेश्राम  यांचा कल्पेश हा मुलगा आहे.त्यांची बहीण सोनिया नागपूर येथे इलेक्ट्रिक  इंजिनिअरिंग शिक्षक आहे.सोनिया व कल्पेशने तळोधी(बा) येथील लोकविद्यालयातून शिक्षण पूर्ण  केले.
  त्याने लोकविद्यालयातून दहावीची परीक्षा 94.40 टक्के गुणासह उत्तीर्ण केली.पुढील 12वी चे शिक्षण डॉ.आंबेडकर कॉलेज नागपूर येथून पूर्ण केले.परिस्थितीमुळे त्याला  
शिकवणी वर्ग लावणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने सेल्फ स्टडी करत अभ्यास सुरू केला.पहिल्या प्रयत्नात त्याला सीईटी प्रवेश परीक्षेत कमी गुण प्राप्त झाल्यामुळे पुन्हा त्याने प्रयत्न सुरू केले. कोणत्याही शिकवणी वर्गाशिवाय(कोचिंग क्लासेस)त्याला दुसऱ्या प्रयत्नात सीईटीमध्ये 96.48% गुण प्राप्त केले.त्याला मुंबई येथील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.त्याला भविष्यात सॉफ्टवेअर डेव्हलपर व्हायचे आहे .त्यांचा निकाल लागताच आईवडीलांनी त्याचे कौतुक केले आहे.त्याच्या यशाबद्दल लोकविद्यालय तळोधी(बा) येथील शिक्षक व माजी विद्यार्थी समूहाने कौतुक केले आहे.त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक वाढला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]