नवभारत कन्या विद्यालयाचा उत्कृष्ट निकालमुल येथील नवभारत कन्या विद्यालय मुल या शाळेचा निकाल उत्कृष्ट लागला असून विद्यालयाची प्राची पंधरे ९३% सलोणी गुलभमवार ९२.४०% संबोधी लाकडे ९१.६०% सुरभी फलके ९१% गुण घेत प्राविण्य मिळविले आहे. विद्यालयाचा निकाल ९२.१६ टक्के लागला आहे.
यावर्षी शालांत परीक्षेला नवभारत कन्या विद्यालयाचे 166 विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. यातील १५३ विद्यार्थिनी पास झाले आहे. पैकी ४ विद्यार्थ्यीनी ९०% पैक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाल्या. १५ वि विद्यार्थिनी 80 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविल्या तर १४ विद्यार्थ्यीनीनी ७५% गुण घेत प्राविण्य मिळविले आहे.
प्रथम श्रेणीत विद्यालयाचे 63 विद्यार्थिनी पास झाले.
या सर्व विद्यार्थिनींचे आणि शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब वासाडे कार्याध्यक्ष डॉ. राममोहन बोकारे सचिव अॅड. अनिल वैरागडे मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार, पर्यवेक्षक छत्रपती बारसागडे यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]