चिमूर विधानसभा क्षेत्रातील क्रांती भूमीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संदीप कावरे यांनी दिले निवेदन

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर हे गाव क्रांती भूमी शहर अशी ओळख असून या ठिकाणी कोणतीही कंपनी  व कारखाना नसल्याने रोजगाराची संधी जनतेला उपलब्ध होत नाही. त्यामुळे चिमूर येथे बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्याची मागणी चिमूर विधानसभा युवक कांग्रेस चे माजी अध्यक्ष संदीप कावरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

    चिमूर या शहरास स्वातंत्र लढ्यातील ऐतिहासिक शहर अशी ओळख असून याच तालुक्यात जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. चिमूर सह तालुक्यात एकही कारखाना नसल्याने बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध नाही.त्यामुळे वणवण भटकावे लागत आहे. त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत होत आहे.भविष्यात बेरोजगार युवकांना कठीण संकटातून जावे लागणार आहे. 

    चिमूर येथे कारखाना किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्यास रोजगार उपलब्ध होईल.जीवनमान उंचावेल. चिमूर क्रांती भूमीत बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध निर्माण करून देण्याची मागणी चिमूर विधानसभा युवक कांग्रेस चे माजी अध्यक्ष संदीप कावरे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]