महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे मूल येथे वैद्यकीय तपासणी संपन्न.

   
            
मूल (प्रतिनिधी)
      समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे रविवार दिनांक १८मे २०२३ रोजी मूल येथे वैद्यकीय तपासणी  आणि आरोग्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
    महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात. 
      आज आयुर्वेद संदर्भात समाजाला महत्त्व कळावे या उद्देशाने आयुर्वेदाचार्य डॉ . शिवानंद गादेवार (ब्रम्हपूरी ) यांचे मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी करण्यात आली .
       हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी  न्यासाच्या वतीने  सौ.माधवी येलंकीवार,सौ .भारती कोंतमवार यांनी परिश्रम घेतले . 
    या उपक्रमाचा लाभ समाजातील एकूण १७ जणांनी घेतला.
                      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]