चंद्रपूर शास.औ.प्र.संस्थेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा लोंढा





चंद्रपूर (प्रतिनिधी) ‌- 
 चंद्रपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत      शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश घेण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी विद्यार्थांनी एकच गर्दी केली आहे. गेल्या १२ जून पासूनच आँनलाईन  प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली असून रोजगार स्वयंरोजगार च्या दृष्टीने मोठा कल वाढला आहे. इच्छुक उमेदवारांनी  www.admission.dvet.gov.in या  संकेतस्थळावर जाऊन प्रवेश पध्दती, नियमावली चां अभ्यास करावा.  इयत्ता १० वी च्या गुणपत्रिकेतील गुणांच्या आधारे केंद्रीय ऑनलाईन  प्रणाली व्दारे प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रक्रियेत संस्थेत येऊन उमेदवारांस   अर्ज  पडताळणी ,स्विकृती ,निश्चिती करता येईल.  प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर नोंदविणे अनिवार्य आहे.अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवाराचे प्रवेश खाते आणि त्याचा नोंदणी क्रमांक हाच यूजर आयडी म्हणून तयार होईल. अर्ज शुल्क राखीव प्रवर्गासाठी १०० रु. आहे तर खुल्या प्रवर्गासाठी रू. १५० आहे .‌  प्रवेश अर्जातील माहितीच्या दाव्याच्या पृष्टयर्थ आवश्यक मुळ/ कागदपत्रांच्या छायांकीत प्रतीचा संच सोबत असावा. निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाचाच सर्व प्रवेश फेरी करता विचार करण्यात येईल. प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाइन निवड पत्र उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित रहावे. दि. १९ जून पासून ११ जुलै पर्यंत अर्ज स्वीकृती केंद्रात प्रवेश अर्ज निश्चित करण्यात येणार आहे.
     पायाभूत व्यवसाय प्रशिक्षण या जिल्हास्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये देण्यात येत असून औद्योगिक आस्थापनेत वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री व तंत्र यांचे ज्ञान व कौशल्य प्राप्त व्हावे  यासाठी शिकाऊ उमेदवारी योजना अस्तित्वात आलेली आहे.
      प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्था निहाय विकल्प  सादर करण्यासाठी दि. १९ जून ते १२ जुलै या दरम्यान करता येईल . प्राथमिक गुणवत्ता यादी दि. १३  जुलैला  प्रसिद्ध होईल. प्रवेश अर्जातील हरकतीनंतर अंतिम गुणवत्ता यादी दि.१६ जुलै रोजी प्रसिद्ध होईल. पहिली प्रवेश फेरी दि.२१ जुलै ते २५ जुलै पर्यंत होणार आहे.  उमेदवाराने सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावी. 
    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे २२ व्यवसायाच्या  ३६ तुकड्यांमध्ये  एकुण ७७६ जागांसाठी  प्रवेश प्रक्रिया होत असून या  संधीचा लाभ घ्यावा, असे  शास.औ.प्र.संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]